जिल्ह्यात आज ९६ कोरोनाबाधितांची वाढ

Foto
आज सकाळी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ९६ रुग्णांची वाढ आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही १५८७० वर जाऊन पोहचली आहे. 

आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १५८७० कोरोनाच्या रुग्णांपैकी ११६७६ जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आजपर्यंत एकूण ५१३ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याने सध्या ३६८१ रुग्णांवर उपचार सुरु आहे. 
शहरात ७४ रुग्ण वाढले
शहरात आज सकाळी पहिल्या टप्प्यात ७४ कोरोनाचे रुग्ण वाढले. त्यात समृद्धीनगर एन चार सिडको-३, भानुदासनगर -२, नारेगाव-१, मधुरानगर -१, मयूरनगर-१, मोची गल्ली-२, क्रांतीनगर-१, रोकडा हनुमान कॉलनी-२, जालाननगर, बन्सीलालनगर-१, शिवाजी नगर, सूतगिरणी रोड -२, न्यूगणेशनगर, अहिल्यानगर चौक-१, एन सहा, सिंहगड कॉलनी, सिडको -१, सैनिकनगर, पडेगाव रोड-१, नक्षत्रवाडी -१, शिवाजीनगर -१, देशमुखनगर, गारखेडा-१, मोचीवाडा, पदमपुरा-१, एकनाथनगर-१, उस्मानपुरा-१, कर्णपुरा-१, होनाजीनगर, जटवाडा रोड-१, श्रीकृष्णनगर, शहानूरवाडी-१, जयभवानीनगर-५, बालाजीनगर -२, मिल कॉर्नर -२, उल्कानगरी, गारखेडा-१, विद्यानिकेतन कॉलनी-१, एन सात, अयोध्यानगर-७, ब्रिजवाडी-३, माणिकनगर, नारेगाव -३, एन दोन, जे सेक्टर-२, गोलवाडी-१, राजाबाजार, बालाजीमंदिर परिसर-२, सौजन्यनगर -१, स्वराजनगर-१, शिवशंकर कॉलनी -१, बुद्धनगर-४, घाटी परिसर-१, इतर-६, भावसिंगपुरा-२, छावणी परिसर-१, गंगा अपार्टमेंट परिसर, बेगमपुरा-१ या भागातील रुग्णांचा समावेश आहे. 
ग्रामीण भागात वाढले २२ रुग्ण
ग्रामीण भागात २२ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यात 
खुलताबाद -१, गणेशनगर, सिडको महानगर, बजाजनगर-१, वडगाव कोल्हाटी, बजाजनगर-१, पोलिस स्टेशन परिसर, वाळूज-२, ओमसाईनगर, जोगेश्वरी -२, लिलासन कंपनी परिसर, रांजणगाव -१, फुलंब्री भाजी मंडई परिसर -२, स्नेहनगर,सिल्लोड-१, सिल्लोड उपविभागीय रुग्णालय परिसर -१, शिवाजीनगर,सिल्लोड-१, टिळकनगर,सिल्लोड-२, भराडी, सिल्लोड -२, बोरगावबाजार, सिल्लोड-१, करमाड-४ या भागातील रुग्णांचा समावेश आहे. 
चार कोरोनाबाधितांचा मृत्यू 
खासगी रुग्णालयात शहरातील अल्ताफ कॉलनीतील ४६ वर्षीय पुरूष, सिडकोतील ६२ वर्षीय स्त्री, बजाजनगरातील ५७ वर्षीय स्त्री आणि वाळूज परिसरातील मनिषा कॉलनीतील २८ वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.